राज्यसरकारी, निमसरकारी जिल्हा समन्वय समिती स्थापन

अध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे;जुनी पेन्शन बाबत उठविणार आवाज

सिंधुदुर्गनगरी ता ८ राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन कोरगांवकर आणि सरचिटणीस पदी सत्यवान माळवे यांची एकमताने निवड करण्यात आली.

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची सभा आज सपन्न झाली. १४ मार्चच्या बेमुदत आंदोलनाच्या प्रचारासाठी ओरोस येथे जिल्हा नियोजन समिती जुने सभागृह येथे विभागीय सहसचिव सन्मा. संदीप नागे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

एकच मिशन,जुनी पेन्शन , या एकमेव मागणीसाठी हे आंदोलन मध्यवर्ती संघटनेने पुकारलेले आहे.जुनी पेन्शन बाबत सकारात्मक चर्चा झाली तरच इतर प्रश्न विचारात घेतले जातील. जिल्हास्तरावर नियोजन करून हे आंदोलन आपणास यशस्वी करायचे आहे.त्यासाठी जिल्ह्यातील कर्मचारी समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनानी सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष,सचिव यांचे फोन नंबर आमच्या वॉट्सअप नंबर वर सेंड करा. म्हणजे ग्रुपवर ऍड करता येतील.
संपाची माहिती सर्वांपर्यंत पोचावी आणि प्रसार ,प्रचार व्हावा यासाठी गुरुवार् ९ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ४ वाजता समन्वय् समितीच्या सर्व घटक संघटनानची बैठक प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी,सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित केली आहे. तरी सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page