एकजण ताब्यात;पाच लाख आठ हजारचा मुद्देमाल जप्त:
आंबोली ता.०७-: आंबोली चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ५ लाख ८ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय 36) असे त्यांचे नाव आहे त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी दूरक्षेत्र आंबोली येथे दीपक शिंदे दत्ता देसाई होमगार्ड जंगले यांनी केली आहे.
