सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सवात लोरे गुरववाडी शाळेचे यश

⚡कणकवली ता.०४-:
डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये जिल्हापरिषद प्राथमिक शाळा लोरे गुरववाडी शाळेच्या विदयार्थ्यांनी लहान गट समूह नृत्य स्पर्धा प्रकारात जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवून आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
यशस्वी विदयार्थ्यांना मुख्याध्यापक अमोल बाळकृष्ण जाधव व उपशिक्षिका श्रीम. शिल्पा पारकर यांनी मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, कणकवली गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्रप्रमुख सुभाष महाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पेडणेकर, सर्व पालक, ग्रामस्थांनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page