कट्टा सेवांगण येथे गोधडी शिवणकाम प्रशिक्षण संपन्न

ओरोस ता.०४-:* बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. मातृमंदिर देवरुखच्या तज्ञ मार्गदर्शिका सौ अंजली माळी आणि त्यांच्या सहकारी कु रुपा जोयशी व कु दीपाली जोयशी यांच्या मार्ग दर्शना खाली महिलाना हे प्रशिक्षण दिले गेले. दोन दिवस हे प्रशिक्षण घेण्यात आले.

यावेळी सौ माळी यांनी गोधडी आणि रजई तयार करून एखादी महिला उदरनिर्वाह करू शकते हे उपस्थित सर्व महिलांना स्पष्ट करून सांगितले. सर्व महिलानी अत्यंत आत्मीयतेने व आवडीने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. गोधडी बरोबरच पाय पुसणी व बटवा याचेही प्रशिक्षण देण्यात आले. समारोप कार्यक्रमात सौ मेस्त्री, सौ सरमळकर, कुमारी चव्हाण यानी आपल्या अत्यंत कुशल प्रशिक्षणाबद्दल सौ माळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. सौ माळी यानी प्रशिक्षणार्थी यांच्या शिकण्याच्या आवडीबद्दल आनंद व्यक्त करून गरज पडल्यास आपण पुन्हा प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचे नमूद केले.
यावेळी आरती कांबळी यानी मनोगत व्यक्त केले.
सौ अजली माळी व सहकाऱ्यांचा सेवांगणच्यावतीने स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण वर्गाचे नियोजन सुजाता पावसकर आणि बाळकृष्ण गोंधळी यानी केले होते. किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळवडेकर, मनोज काळसेकर, आरती कांबळी, सौ मठकर यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page