वायरी भूतनाथ स्मशानभूमी रस्त्याजवळील बंधारा कामाला प्रारंभ

उपसरपंच प्राची माणगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन

मालवण दि प्रतिनिधी :
राज्याचे माजी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात शिफारस पत्र दिल्यानंतर नियोजन मंडळाच्या सभेत मंजूर झाल्यानंतर काही काळ रखडलेल्या वायरी भूतनाथ ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी रस्त्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा कामाचे भूमिपूजन अखेर ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले

माजी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या शिफारस पत्रानुसार सन २०२०-२१ मध्ये नियोजन मंडळाच्या सभेमध्ये या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हे काम काही कारणास्तव रखडले होते. काँग्रेस जिल्हा सेवादलचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, तळवडेकर, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, ग्रामपंचायत सदस्य ममता तळगावकर, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, मुन्ना झाड, दिलीप मसुरकर, भाई चव्हाण, बाबू लोकेगावकर, गिरीश तळवडेकर, हर्षद हळदणकर, श्रेयस माणगावकर, सुनील देऊलकर, ठेकेदार श्री. वाळके आदी उपस्थित होते.

या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. शेख यांचे यावेळी आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page