⚡मालवण ता.०१-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल मालवण आयोजित आणि भंडारी हायस्कूल एस्.एस्.सी् १९७१- ७२ बॅच पुरस्कृत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विविध गटातून रोहित डिचोलकर, कौस्तुभ गावडे,पार्थ मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
भंडारी हायस्कूल मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत १ली ते ४थी गटामध्ये ५४, ५वी ते ७वी गटामध्ये ४४आणि ८वी ते १०वी गटात ६५ अशा एकूण १६३ मुलांनी सहभाग घेतला. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना व दोन उत्तेजनार्थ स्पर्धाकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच DOMS इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कडूनही उत्तेजनार्थ प्रत्येक गटात प्रत्येकी पाच आकर्षक चित्र काढलेल्या मुलांना रंगसाहित्य देण्यात आले. लक्षवेधी चित्र काढलेल्या प्रत्येक गटातील प्रत्येकी चार मुलांना चित्रकार अनिल आचरेकर यांच्याकडून रंगसाहित्य देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला १९७१/७२ बॅच तर्फे रंगसाहित्य भेट देण्यात आले.
पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, मुख्याध्यापक वामनराव खोत,१९७१/७२ बॅच चे अध्यक्ष अरुण भोगले, सचिव मुकुंद काजरेकर, खजिनदार उल्हास पराडकर आणि उपस्थित सदस्य सौ.अश्विनी नाईक, नॅविल राॅडरिक्स, किशोर शिगले, चंद्रकांत रेवंडकर, राजीव अंधारी, विष्णू कोरगांवकर, मोहन केरकर, अनिल आचरेकर आणि सौ.अदिती आचरेकर यांचे हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक अरविंद जाधव, अनिल आचरेकर, बी.जी.सामंत, संभाजी कोरे आणि श्री. महाभोज यांनी केले. याप्रसंगी कलाभूषण पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक श्री.अरविंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
गट १ -पहिली ते चौथी- १.रोहित विठ्ठल डिचोलकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), २.ओजस्वी कैलास साळुंके (एम्.एम्.परुळेकर प्राथमिक शाळा मालवण), ३.जुई सुधाकर धारगळकर (शासकीय मत्स्य शाळा तारकर्ली), उत्तेजनार्थ- हार्दिक उमेश परुळेकर (अंबाजी विद्यालय मालवण)
कोमल निलेश नारिंग्रेकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), गट क्रमांक २- पाचवी ते सातवी- १.कौस्तुभ राजन गावडे (भंडारी हायस्कूल मालवण), २.वेदिका पंढरीनाथ करवडकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा)
३.लौकीक गणेश मालवणकर(रोझरी इंग्लिश स्कूल मालवण), उत्तेजनार्थ-
पद्मजा दत्तात्रय जाधव (रोझरी इंग्लिश स्कूल मालवण), प्रणया दत्ताराम चव्हाण (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण). गट क्रमांक ३- आठवी ते दहावी)- १.पार्थ साईनाथ मेस्त्री (भंडारी हायस्कूल मालवण), २. मयुरेश दिलीप वायंगणकर (भंडारी हायस्कूल मालवण), ३. योगिता रामचंद्र मांजरेकर (श्रीरंग लाडकोबा देसाई विद्यालय), उत्तेजनार्थ- संजीवनी यशवंत परब (टोपीवाला हायस्कूल मालवण), अश्विनी परमेश्वर तांबे(टोपीवाला हायस्कूल मालवण).
