दयासागर छात्रालयाय जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्य वाटप

रॉटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युवा संघाचा उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे रोणापाल येथील दयासागर छात्रालय येथे भेट देऊन जीवनावश्यक वस्तू, शालेय उपयोगी वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सहसचिव मिताली सावंत, शुभम केसरकर रोहन कुबडे, मुईन खान, कौस्तुभ दळवी, गार्गी विर्नोडकर, साईस्वरूप देसाई, रोटरी क्लबचे रत्नाकर आगलावे, दयासागर छात्रालयचे व्यवस्थापक जीवबा वीर उपस्थित होते. यावेळी मुलांनी विविध कथा व काव्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
अक्षय मयेकर म्हणाले की, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ ही संघटना सामाजिक हित जपणारी संस्था आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असल्याने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम दयासागर छात्रलय करत आहे. भविष्यात या छत्रलयाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

You cannot copy content of this page