जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुती शेवडे हीचे यश

उभादांडा इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी

⚡वेंगुर्ले ता.२७-: न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची श्रुती श्रीधर शेवडे हिने खर्डेकर महाविद्यालयात शिवजयंती चे औचित्य साधून संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटातून सहभागी होत यश मिळवलं

श्रुती हि नववी इयत्तेत शिकणारी न्यू इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी असुन तीने या स्पर्धेत उत्तेजनार्थ नंबर पटकावला तर मळगाव खानोलकर वाचन मंदिर यांनी घेतलेल्या जिल्हा स्तरीय निबंध लेखन स्पर्धेतही यश मिळवलं
या दोन्ही स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या श्रुती शेवडे हिला प्रा.वैभव खानोलकर आणि या प्रशालेचे लिपीक अजित केरकर यांनी हि मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल मुख्याध्यापक वाळवेकर ,सर संस्थाध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर ,उपाध्यक्ष रमेश पिगुळकर ,सचिव रांगोळी कार रमेश नरसुले याच बरोबर इतर पदाधिकारी यांनी
यशस्वी विद्यार्थ्यांनी श्रुती श्रीधर शेवडे आणि तिचे मार्गदर्शक प्रा.खानोलकर , श्री केरकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
या जिल्ह्यास्तरीय यशा बद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे

You cannot copy content of this page