आसाम येथील अपघातात सहा जणांचे निधन

मिलाग्रिस हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी मिलाग्रीन डांन्टस यांचा समावेश

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आणि ख्रिस्ती धर्म प्रसारक तसेच फातिमा संस्थेच्या सिस्टर्स मिलाग्रिन डान्टस (वय ५९) यांचे अपघाती निधन झाले आहे. हा अपघात आसाम शिलाॅन्ग येथे घडला असून, ट्रक ने त्यांच्या चार चाकीला धडक दिल्याने घडला आहे. या अपघात चारचाकी मधून प्रवास करणारे एक फादर, तीन सिस्टर व दोन शिक्षक या सर्व प्रवाशांचे निधन झाले आहे. मिलाग्रीन सिस्टर या सावंतवाडी येथे भटवाडी परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page