नवीन फायर फायटरने दाणोली येथील विझविली आग

शिवसेना भाजप राहिली श्रेयवादात
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझविण्यासाठी उपलब्ध करून देत केले उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.२६-: येथील नगरपरिषदेत नव्याने दाखल झालेल्या फायर फायटरचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू असतानाच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी एका ठिकाणी लागलेली आग विझवून पुढील अनर्थ टाळण्यासाठी नवीन फायर फायटर पाठवून देत या फायर फायटरचे उद्घाटन केले आहे.


25 फेब्रुवारी रोजी दाणोली येथील मनोहर मालवणकर यांचा संध्याकाळी सात वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना फोन आला. श्री साटम महाराज यांची झरी (पाण्याचा वाहता झरा) येथील मोठ्या झाडाला आग लागली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, असे साळगावकर यांना सांगण्यात आले.
साळगावकर यांनी तात्काळ अधिकारी नाटेकर यांना यांना कल्पना दिली. श्री नाटेकर व नंदू गावकर तात्काळ नवीन फायर फायटर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेथील आग विझवून पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला. या सेवा तत्पर कार्यासाठी तेथील ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष बबन सागावकर व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत आभार मानले.

You cannot copy content of this page