मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचन कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.२६-: मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता नगरवाचनालय, वेंगुर्ला येथे काव्यवाचन कार्यक्रम आयोजित केला आहे.

  यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांची एक कविता सादर करावयाची आहे. सहभागी होणा-यांनी आपली नावे २७ फेब्रुवारी रजी सकाळी १० वाजेपर्यंत संस्थेत आणून द्यावयाची आहेत असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
You cannot copy content of this page