बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात गोवा राज्यातुन आलेल्या गोवा ते कुडाळ या साई पालखी पदयात्रेचे श्री साईबाबा भक्त सेवा मडंळाच्या वतीने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
कुडाळ कवीलकाटे येथील भारतातील पहील्या साईमंदीरा पर्यत हि पदयात्रा जाणार आहे. या पदयात्रेत सुमारे १०० साईभक्त सहभागी झाले आहेत. यामध्ये महीला वर्गाचा सहभाग होता. बांदा येथील ऐतीहासीक साईमठात या पदयात्रेचे आगमन होताच साईभक्ताचे स्वागत करून श्री साईची आरती करण्यात आली. यावेळी श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, सौ. दर्शना केसरकर, जेष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर, गिरी महाजन, शैलेश केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, साईराज साळगावकर, राजेश कारेकर, बंड्या हरमलकर, राज हरमलकर व राजेद्र प्रभु उपस्थित होते.
फोटो :-
बांदा येथे श्री साईबाबा पालखीचे स्वागत करताना श्री साईबाबा भक्तसेवा मंडळाचे पदाधिकारी.
गोव्यातून बांदा येथे आलेल्या साई पालखीचे बांदा येथे साई भक्तांनी केले स्वागत…
