⚡कणकवली ता.२४-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थेच्या व घाडीगांवकर वधुवर सुचक मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बिल्डिंग,शारदा टाॅकिज शेजारी,दादर पूर्व येथे केले आहे.
हे मेळाव्याचे १८ वे वर्ष असुन समाजातील उपवर युवा युवतींनी या संधीचा फायदा घ्यावा. घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष रित्या चर्चा सत्रांकरिता व्यासपीठ दिले जाते. समाजातील नोंदणीकृत व इच्छुक तरुण तरुणींनी यावेळी उपस्थित रहावे. असे आवाहन सरचिटणीस व वधुवर सुचक समिती प्रमुख
गजानन आत्माराम घाडीगांवकर (9405371586) यांनी केले असून शशिकांत महादेव घाडीगांवकर(9869540575)
रमेश शंकर घाडीगांवकर (9969547067), चंद्रकांत संभाजी घाडी(8655434899)
रघुनाथ स घाडीगांवकर (9869654768) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
घाडीगांवकर वधू-वर परिचय मेळावा 26 फेब्रुवारी रोजी होणार
