हसापुर येथे २८ रोजी “इथे ओशाळला मृत्यू” नाट्यप्रयोग

⚡बांदा ता.२४-: हसापुर येथिल श्री सातेरी देवस्थानच्या सतराव्या वर्धापन दिन सोहळ्या प्रित्यर्थ मंगळवार दिनांक २८ रोजी सायंकाळी आठ वाजता ‘अ’ गट स्पर्धेतील तृतीय क्रमांक पारितोषिक विजेते व गोवा ‘ब’ गट राज्यनाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे तिन्ही पारितोषिक प्राप्त संस्था सातेरी कलामंदिर, हसापुर, गोवा प्रस्तुत व प्रसिद्ध नाटककार पद्मश्री प्रा. डॉ. वसंत कानेटकर लिखीत दोन अंकी अजरामर, ऐतिहासिक, आक्रमक शंभु-नाट्य “इथे ओशाळला मृत्यू” यथील सातेरी मैदानावर सादर होणार आहे.
“सातेरी कलामंदिर “हसापूर गोवा प्रस्तुत या नाटकाचे दिग्दर्शन गोविंद नाईक यानी केले असून निर्माता हसापुर ग्रामस्थ, सूत्रधार सुहास मळीक, अर्जुन मळिक, रमेश मळिक असून पार्श्वसंगीत जवाहर बर्वे यांचे आहे. नेपथ्य संकल्पना व रंगमंचीय मार्गदर्शन गणेश ठाकूर व निलेश मोहन नाईक व प्रकाशयोजना दीपक बर्वे यांची असून ध्वनी सुभाष शिरोडकर तर वेशभूषा बाबाजी घाडी, रंगभूषा राजेंद्र हरमलकर तर सहाय्यक सावळाराम नाईक, नितेश नाईक, विशांत नाईक, संजय नाईक आहेत.
पोवाडा लेखन परेश नाईक तर निवेदन आणि गायन केदार मेस्त्री यांचे आहे तर छत्रपती शंभू राजांची घोड्यावरून स्वारी हे नाट्याचे विशेष आकर्षण असणार आहे. यात निलेश नारायण नाईक, गोविंद नाईक, अरविंद नाईक, प्रजय मळीक, मैथिली मराठे, सुहास मळीक, राहुल रवींद्र नाईक, चैतन्य गवस, संकल्प नाईक, हर्ष मळीक, साहिल नारुलकर, राजाराम मळीक, वासुदेव मळीक, आयुष मळीक, सर्वेश मळीक, सावळाराम नाईक, आर्यन मळीक, भिसे गवस, विशांत नाईक यांच्या भूमिका आहेत. नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page