⚡बांदा ता.२३-: बांदा येथील अंकुश रामचंद्र माजगावकर यांनी आपली पत्नी (कै.) सौ. अनुपमा अंकुश माजगावकर यांचे स्मरणार्थ नट वाचनालय, बांदा या संस्थेला रू. ११११/- देणगी म्हणून दिले. तसेच श्री. माजगावकर यांनी लिहिलेल्या “माझ जन्मगाव बांदा शहरवजा गांव” या पुस्तकाच्या दोन प्रती वाचनालयाला भेट म्हणून दिल्या.
यापूर्वीही श्री माजगावकर यांनी अनेकवेळा वाचनालयाला आर्थिक मदत व वाचनीय अशी पुस्तके देणगी म्हणून दिली आहेत. त्यांच्या या पुस्तकाला शुभेच्छा देऊन देणगीबद्दल वाचनालयाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आलेत.
