आंबोली,ता.२१: येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हिरण्यकेशी येथील मुर्तीची प्राणः प्रतिष्ठापना मे १३,१४,१५ या दिवशी करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या शिवलिंग आणि गंगा देवीच्या मूर्तीची पुनः प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.आंबोली ग्रामस्थांनी या तीन दिवसात आपले कोणते धार्मिक कार्यक्रम असतील तर ते रद्द करावे . आणि सर्वानी मिळून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.शेजारच्या आजूबाजूच्या गावातील तसेच पै पाहुणे यांनी या धार्मिक सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आंबोली ग्रामस्थांनी केले आहे.
आंबोली हिरण्यकेशीची प्राणप्रतिष्ठापना १३, ते १५ मे रोजी…
