ब्रिगेडियर सुधीर सावंत: एकनाथ शिंदे २०२४ ला सुद्धा मुख्यमंत्री होणार: व्यक्त केला विश्वास
⚡सावंतवाडी ता.२१-: खरी शिवसेना कोणाची ? हे निवडणूक आयोगने निकाल दिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करू लागल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचा झपाट्याने विकास करत असून अनेकांना ते न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे २०२४ ला सुद्धा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते येथील मंत्री दीपक केसरकर कार्यलायात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी उप जिल्हा प्रमुख अशोक दळवी,तालुकाप्रमुख बबन राणें आदी उपस्थित होते.
