लवकरात लवकर गांधी स्मारक पूर्ण करणार-डॉ.अमेय देसाई

⚡वेंगुर्ला ता.२१-: भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डॉ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. हे स्मारक होण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधी यांचे मार्फत शासकीय दफ्तरी झालेला पाठपुरावा जाणून घेऊन येणा-या समस्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर गांधी स्मारक प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन डॉ.अमेय देसाई यांनी दिले.

  यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य अर्चना नाईक, हेतल गावडे,  रेडी, शिरोडा, आरवली शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, विद्याधर धानजी, महादेव नाईक, शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर, अनिल गावडे, बाळकृष्ण परब, शिरोडा शहर भाजप पदाधिकारी विकास परब, जितेंद्र आजगांवकर उपस्थित होते.

  शिरोडा ग्रामपंचायतीने केलेला प्रस्ताव व आतापर्यंतचा झालेला पाठपुराव्याबाबत माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, माजी उपसरपंच राहुल गावडे, विद्यमान ग्रा.पं.सदस्य मयुरेश शिरोडकर यांनी माहिती दिली. यावेळी डॉ.अमेय देसाई यांनी स्मारक संदर्भात कमिटी बनवून मंत्रालयामध्ये जी काय मदत लागेल ती देण्याची आपली तयारी असल्याचे आश्वासन दिले.
You cannot copy content of this page