अनधिकृत वाळू संदर्भात तहसीलदारांवर पाळत ठेवणाऱ्या संशयितांच्या मोटरसायकल ताब्यात

कुडाळात तहसीलदार यांच्या कडून बेधडक कारवाईचे सत्र सुरू

⚡कुडाळ ता.१७-: अनधिकृत वाळूच्या अनुषंगाने त तहसीलदार यांच्यावर पाळत ठेवणाऱ्यांव तहसीलदार अमोल पाठक यांनी कारवाई करत कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर थांबलेल्या पाच मोटरसायकली यांनी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री आठ वाजता करण्यात आली असून अनधिकृत वाळूला लगाम लावण्यासाठी ही कारवाई आहे.
कुडाळ तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर वाळू व्यवसायाशी निगडित काही जण तहसीलदार यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय तहसीलदार यांना गेल्या काही वर्षांत आहे. या अनुषंगाने दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी आढळते. काहीवेळा तर तहसीलदार यांच्या गाडीचा पाठलाग केला जात असल्याचीही चर्चा आहे. बुधवारी रात्री ८ वा. तहसीलदार आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या कार्यालयानजीकच्या शासकीय ईमारत परिसरात काही अनोळखींची गर्दी दिसली. तहसीलदार अमोल पाठक यांनी गाडी थांबवून त्या दिशेने गेले. यावेळी तहसीलदार येत असल्याचे समजताच यातील काही व्यक्ती आपल्या मोटरसायकल तिथेच टाकून पळून गेले. यानंतर तहसीलदार यांनी यातील पाच मोटरसायकल ताब्यात घेत त्या तहसीलदार कार्यालयात आणून ठेवल्या आहेत. तहसीलदार कार्यालयासमोर थांबलेल्या या व्यक्ती व व्यवसायाच्या अनुषंगाने आपल्यावर पाळत ठेवण्यासाठीच असतात असा संशय असून या अनुषंगानेच ही कारवाई केल्याचे तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले आहे. या कारवाईदरम्यान मोटर सायकल धारक घटनास्थळावरून पळून गेल्याने या ठिकाणी थांबलेले नेमके कोण होते? ते अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या मोटरसायकलच्या नंबर नुसार आरटीओ विभागाकडे कुडाळ तहसीलदार माहिती मागून दोषींवर आवश्यक ती कारवाई करणार आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या मोटरसायकल अधिकृत वाळू व्यवसायाची निगडित संबंधितांच्या आहेत का ? याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले आहे.

You cannot copy content of this page