नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या चारही संशयितांना पोलिसांनी केली अटक..

कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू वाहतुकीबाबत कारवाई दरम्यान कुडाळ नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी यांना मारहाण प्रकरणी फरार असलेल्या तीन डम्पचालकांसह एकूण चौघांना सोमवारी कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी त्यांना अटक करत चौघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कुडाळ तालुक्यात अनधिकृतपणे होणार्या वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी कुडाळ तहसीलदार यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार, तलाठी यांचे पथक कुडाळ तालुक्यात गस्त घालत होते. यादरम्यान तीन डंपर चालकांना अडवून त्याच्याकडे पासाची विचारणा केल्यावर झालेल्या बाचाबाचीतून नायब तहसीलदार व तलाठी यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी एकूण ११ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. तर यातील संतोष विश्वंभर मठकर रा.३८ या मठ ता. वेंगुर्ले, विनय कुमार नरेश सिंह ३६ रा. झारखंड, संदीप कुमार अशोक सिंह ३१ रा झारखंड तीन डंपर चालक अद्याप पर्यंत फरार होते. या तिघांसह साईराज दयानंद अणावकर (२४ रा.पणदूर ) या चौघांना सोमवारी कुडाळ पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी त्यांना कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयासमोर पोलिसांनी तीन दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती ‌. न्यायालयाने याप्रकरणी या चौघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page