जिल्हा न्यायालयाच्या रक्तदान शिबिरात ६६ जणांचे रक्तदान…

ओरोस ता.१४-:

जिल्हा व सत्र न्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारूका यांनी रक्तदान करून समाजाप्रती प्रेम भावनेचा व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी ६६ जणांनी रक्तदान केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारूका, मुख्य न्यायदंडाधिकारी ए एम फडतरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश डी बि. म्हलटकर, जिल्हा वकील संघटना अध्यक्ष ऍड राजेंद्र रावराणे, गोवा व.महाराष्ट्र बार काऊन्सिल उपाध्यक्ष ऍड संग्राम देसाई, ऍड उमेश सावंत, जिल्हा सरकारी वकील संदीप राणे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी, ऍड अमोल सामंत, एड यतिश खानोलकर, कोर्ट व्यवस्थापक प्रशांत मालकर आदी सह न्यायालयीन अधिकारी कर्मचारी आणि जिल्हाभरातील वकील उपस्थित होते.

You cannot copy content of this page