वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात १५ रोजी ‘शांकभरी महिमा‘

⚡वेंगुर्ला ता.१४-: महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील रामेश्वर मंदिरात बुधवारपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ होत असून रथावर आरुढ होणा-या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा अजित गाडगीळ लिखीत ‘शांकभरी महिमा‘ हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी नाट्यरसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान तर्फे केले आहे.

You cannot copy content of this page