ओरोस हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिल्या ५० खुर्च्या

३००९-१० च्या दहावी विद्यार्थ्यांचा उपक्रम

ओरोस ता १४
धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल संचलित न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी या प्रशालेच्या २००९-१० च्या दहावी वर्गाच्या मुलांनी प्रशाळेला ५० प्लास्टिक खुर्च्या दिल्या आहेत. १३ फेब्रुवारी रोजी या माजी विद्यार्थ्यांचा पहिलाच स्नेहमेळावा झाला. त्यावेळी खुर्च्या प्रदान करण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे संचालक प्रभाकर सावंत, मुख्याध्यापक अशोक रायबान, माजी मुख्याध्यापक गुरूदास कुसगावकर, शिक्षक विजयकुमार गोसावी, संजीव राणे, अशोक गिते, उदय सावंत, अनंत साईल, आर्या बागवे, तेजस्विनी पाटील, रतन कसालकर, संजय सावंत, अरविंद दळवी, गजानन मुरमुरे, राजेंद्र शिंगाडे, गौतम कदम आदी उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थी अल्पेश रासम, तुषार सावंत, कमलेश वंजारे, सुहेल शेख, पृथ्वीराज लोणे, ओंकार राऊळ, ओंकार कुडाळकर, रोहित कुडाळकर, अमित डोंगरे, दत्ताराम सुद्रिक, सिद्धेश परब, रेखा पांचाळ, उल्का मेस्त्री, कविता परब, दीक्षा परब, श्रद्धा राऊळ, सुलभा चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: न्यू इंग्लिश स्कूल प्रशाळेला खुर्च्या प्रदान प्रसंगी २००९-१० चे दहावी वर्गाचे विद्यार्थी. सोबत प्रभाकर सावंत, अशोक रायबान व अन्य

You cannot copy content of this page