जबाबदार अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे;भाजप माजी शहाराध्यक्ष संजू शिरोडकर यांची मागणी
⚡सावंतवाडी ता.१४-: येथील मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याचे सुरु असलेले काम जबाबदार बांधकाम अधिकारार्याच्या अनुपस्थितीत होत असल्याने ते निकृष्ठ दर्जाचे होण्याची भीती भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर यांनी व्यक्त करत अधिकाऱ्यानी स्वतः उपस्थित राहून हे काम करुन घ्यावे अन्यथा काम बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील कोसळलेला मोती तलावाचा कठडा नव्याने बांधण्यात येत आहे गेले काही दिवस याचे काम सुरू आहे मात्र हे काम होत असताना त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जबाबदार अधिकारी उपस्थित असणे गरजेचे असताना या ठिकाणी बांधकाम विभागाचा कोणीही अधिकारी उपस्थित नाही याबाबत भाजपाचे माजी शहर अध्यक्ष श्री शिरोडकर यांनी नाराजी दर्शवली आहे त्यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली त्यात त्यांनी असे म्हटले की, बांधकाम चा जबाबदार अधिकारी नसताना कोसळलेल्या कठड्याचे काम सुरू आहे, त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होण्याची दाट शक्यता आहे लाखो रुपये खर्च करून होणारे हे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे त्या ठिकाणी दर्जाहीन काम झाल्यास भविष्यात पुन्हा कठडा कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी या कामाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हे काम दर्जेदार करून घ्यावे त्या ठिकाणी बांधकाम चा जबाबदार अधिकारी तैनात ठेवून त्यांच्या देखरेखीखाली हे काम व्हावे अन्यथा नागरिकांना घेऊन सदरचे काम बंद पाडण्यात येईल येईल.
ते म्हणाले, कठड्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणताही धोका नजीकच्या महामार्गाला होणे काम करताना मुळातच चुकीच्या पद्धतीने आणि दर्जाहीन झाल्यास त्याचा परिणाम काही वर्षांनी दिसून येऊ शकतो त्यामुळे आत्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि स्थानिक नगरपालिका प्रशासनाने या जातीनिशी लक्ष घालावा.
