शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी मोबाईल वापर जपून करावा

पोलीस हवालदार फकृददीन गुलाबसो यांचे आवाहन

देवगड –
इंटरनेटच्या वाढत्या फायद्यामुळे सायबर गुन्हेगारी सारख्या भयंकर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.सायबर क्राईममुळे अन्यायग्रस्त व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक,शारीरिक व मानसिक नुकसान होते म्हणून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा जपून वापर करायला हवा असे प्रतिपादन देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार , फकृददीन गुलाबसो आगा यांनी आज येथे व्यक्त केले. देवगड पोलीस स्टेशनच्या वतीने जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत रायझिंगडे सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.


रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस ठाणे हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनला भेटीचे आयोजन करणे ,शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक समस्या / सुरक्षा व वाहतूक नियम या विषयांवर मार्गदर्शन करणे , शालेय मुलांना सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन करणे , महिला संरक्षणासंबंधी कॉलेज विद्यार्थ्यांची रॅली काढणे अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये देवगड पोलीस स्टेशन मार्फत केले जाणार आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस हवालदार – राजन सदाशिव जाधव, पोलीस नाईक – महेंद्र विश्वनाथ महाडिक, महिला पोलीस नाईक – प्राची अशोक धोपटे , पोलीस शिपाई – विशाल देवजी वैजल, ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय गोगटे व सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस हवालदार राजन जाधव यांनी मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर,पोलीस नाईक महेंद्र महाडिक यांनी रायझिंग डे सप्ताहाची पार्श्वभूमी या विषयावर , महिला पोलीस नाईक प्राची धोपटे यांनी युवक – युवतींची गैरवर्तणूक या विषयावर, तर पोलीस शिपाई विशाल वैजल यांनी वाहतूक नियमा संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री.सुनील जाधव तर आभार प्रदर्शन .संजय गोगटे यांनी केले.

You cannot copy content of this page