मोपावरील पहिल्या हवाई प्रवासाचा आनंद भाजप युवा नेते विशाल परब यांनी अनुभवला

भाजपचे गोवा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर होते सोबत

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नजीक असलेल्या गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत उड्डाण आजपासूप सुरू झाले. या पहिल्या गोवा ते मुंबई विमानात भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हवाई प्रवास केला. भाजपचे गोव्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांच्यासोबत विशाल परब यांनी हा प्रवास केला.

पहिल्या प्रवासाने आपल्याला अतिशय आनंद झाला असून सिंधुदुर्गवासियांना हे विमानतळ म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांना धन्यवाद देत असल्याची प्रतिक्रिया या विमानातून प्रवास केल्यानंतर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिली.

सावंतवाडी इथून गोव्याला जाण्यासाठी दोन अडीच तास लागत होते. आता सावंतवाडीवरून अवघ्या पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेले मोपा अंतर गाठण्यासाठी अवघे पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि वेळेची बचतही होत असल्याची प्रतिक्रिया विशाल परब दिली आहे.

You cannot copy content of this page