⚡बांदा ता.०४-: बांदा – सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामींचा पुण्यतिथी उत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मठपर्वतावरील श्री स्वामीच्या समाधीस्थानी तसेच श्री रामभटस्वामी मंदिरात ब्राम्हणद्वारा पुजाअर्चा अभिषेक आदींसह विविध धार्मिक विधी करण्यात आले.
दुपारी श्रींना महानैवेद्य अर्पण करुन भाविकांच्या उपस्थितीत नामस्मरण व महाआरती करण्यात आली.त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला. हजारो भाविकांनी या सोहऴ्याचा लाभ घेतला.श्री रामभट स्वामी मित्रमंडळ व मठवासीय ग्रामस्थांकडून या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
