⚡बांदा ता.०४-: श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल श्री देवी माऊली देवस्थान रोणापाल आयोजित मंदिरात दि.4 ते 8 जानेवारी दरम्यान पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांसोबत दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. मंदिरात दररोज दुपारी १२ वा. व सायं. ७ वा. महाआरती होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
बुधवार दि ४ रोजी रात्रौ ८ वा. राजन परब व निलेश नाईक पुरस्कृत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा ‘अमृत कलश’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. ५ रोजी रात्रौ ८ वा. कै. चंद्रकांत सिताराम गावडे यांच्या स्मरणार्थ गणेश(दादा) गावडे पुरस्कृत आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा ‘विधिलिखित’ नाट्यप्रयोग होणार आहे.
शुक्रवार दि. ६ रोजी रात्रौ ८ वा. अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा ‘प्रतिशोध’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
शनिवार दि. 7 रोजी रात्रौ ८ वा. तळेवाडी युवक मंडळ रोणापाल पुरस्कृत बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा ‘वेडा चंद्रहास’ नाट्यप्रयोग होणार आहे.
रविवार दि. ८ रोजी सकाळी १० वा. लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम व शुध्दीकरण कार्यक्रम, महाआरती, दुपारी ३ वा. सवाद्य देवता भ्रमण, सायं. ७ वा. महाआरती, रात्रौ ८ वा. कुळघर गावडे रोणापाल पुरस्कृत मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा ‘नागभैरव’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी राजाराम नाना नेमण यांनी दररोजचा लागणारे हार, वेणी व फुले तर सचिन परशुराम दाभोलकर पाच दिवसांसाठी लागणारी तुरडाळ तसेच महाप्रसाद श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल, फौजदार गावडे, नवलू कोळापटे, रोणापाल ग्रामस्थ देऊळवाडी, हनुमंत गवस, कुळघर गावडे, संतोष कोळापटे, तसेच सदानंद गावडे, रामनाथ गावडे, तानाजी गावडे, विष्णू सावंत यांनी पुरस्कृत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
