Headlines

अन्यथा अनामत रक्कम मधून चर बुजविणार

कार्यकारी अभियंता सर्वगौड यांचा चर मारणाऱ्या ठेकेदाराला इशारा

⚡सावंतवाडी ता.०२-: येथील कंपनीकडून खोदाई करण्यात आलेले रस्ते काम झाल्यानंतर तात्काळ ते बुजवण्यात यावे अन्यथा अनामत रकमेतून चर आम्ही बुजवू कोणाची गई केली जाणार नाही त्यामुळे अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन काम करा अशा सूचना सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या

सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात गॅस पाईप लाईन घालण्यासाठी चुकीच्या पद्धतीने चर खोदले जात आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे असा आरोप करीत याबाबत गंभीर भूमिका घ्या अशी मागणी मनसेच्या माध्यमातून आज बांधकाम अधिकाऱ्यांकडे करण्यात आले.

यावेळी झालेल्या ठेकेदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री सर्वगोड यांनी तशा सूचना अधिकारी तसेच गॅस कंपनी च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली व सर्व कामे योग्य रीतीने मार्गी लागतील असे आश्वासन बांधकाम अभियंत्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिला.

यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर दोडामार्ग माजी तालुकाध्यक्ष सुनील गवस परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ शुभम सावंत कौस्तुभ नाईक प्रवीण गवस विष्णु मुंज तुकाराम गवस आबा चिपकर अवधूत कारेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page