बांदा पानवळ येथील अंगणवाडी व शाळा फोडण्याचा चोरट्यांचा अयशस्वी प्रयत्न

⚡बांदा ता.०२-:
बांदा शहरातील पानवळ येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.

आज सकाळी मुख्य दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडल्याचे निदर्शनास आले. मात्र आतील कोणतेही सामान चोरीस गेले नाही. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर,बाळू सावंत रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर यांच्यासह घटनास्थळी जातं पाहणी केली. सरपंच नाईक यांनी याची कल्पना बांदा पोलिसांना देत या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली.

You cannot copy content of this page