नांदगाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तपसे यांचा असाही प्रामाणिकपणा

⚡कणकवली ता.०२-: सध्याच्या युगात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा अनुभव कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कोकणी गोडवाचे मालक अवधूत बोभाटे यांना आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी त्यांच्याकडून काजू गर पाकीट खरेदी केले होते. त्या काजू गर पाकीटमधे चक्क अवधूत बोभाटे यांची हातातील सोन्याची अंगठी चुकून आली होती. हे डॉ दत्ता तपसे यांच्या आपल्या गावी गेल्यावर काजू गर पाकीट फोडल्यानंतर लक्षात आले होते.
यानंतर त्यांनी अवधूत बोभाटे यांच्याशी संपर्क साधून पुन्हा नांदगावला आल्यावर त्यांची आलेली सोन्याची अंगठी पुन्हा त्यांना प्रामाणिकपणे परत केल्याने बोभाटे परिवार व सर्वांनी डॉ दत्ता तपसे यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page