गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहमेळावा उत्साहात

⚡कणकवली ता.३१-:
सिंधुदुर्गातील गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि स्नेहमेळावा सिद्धिविनायक हॉल येथे शेकडो नाथबांधव-भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर आपल्या मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी, सचिव अमरदीप गोसावी, विवेकानंद कॉलेज कोल्हापुरचे निवृत्त प्राचार्य प्रा. भाऊसाहेब गोसावी , मंडळाचे सचिव सदानंद गोसावी, उपाध्यक्ष साईनाथ गोसावी, निवृत्त तहसिलदार शरद गोसावी संजय गोसावी, चंद्रकांत गोसावी, संतोष गोसावी, महीला सरपंच सौ.राजलता गोसावी,विठ्ठल गोसावी, अरविंद गोसावी उपस्थित होते.

सन २०२०/२१ व २२ या तीन वर्षातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदविका मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला.या वेळी निवृत्त प्राचार्य प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी यांनी सिंधुदुर्गातील गोसावी समाजाने मठ संस्कृती आणि परंपरा अजुनही उत्तम प्रकारे जोपासली आहे. नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ आपली नाथसमाजाची भुमिका प्राचीन इतिहास व वारसांपुढे चालवत शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवुन समाज बांधवाना दिलासादायक कार्य करत आहे.असे सांगितले.

मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाथपंथी गोसावी बांधवांना एकत्र करुन सन २०२३ मध्ये तालुकावार कार्यकारणी गठीत करणार आहोत. तसेच या वर्षी नाथपंथी गोसावी भवन बांधण्याचा सकंल्प केला आहे. तसेच वधुवर सुचक मेळावा व दिक्षांत विधी कार्यक्रम करण्याचे निश्चित केले. आपल्या जास्तीत जास्त बांधवानी मंडळाचे सभासद होण्याचे आवाहन केले. या वर्षाच्या विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.

गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्नेह मेळाव्यासाठी उपस्थिती लक्षणिय होती या वेळी प्रमुख उपस्थिती रविंद्र गोसावी, रूपाली गोसावी, झिलु गोसावी, सजंय गोसावी, संदीप गोसावी, शकंर गोसावी, सुशिल गोसावी, गणपत गोसावी, सजय गोसावी, उदय गोसावी, समीर गोसावी उपस्थित होते.

सुत्रसंचालन झिलू गोसावी यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप गोसावी व आभार सचिव सदानंद गोसावी यांनी मानले.

You cannot copy content of this page