⚡वेंगुर्ला ता.३१-: तुळस येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत अतिशय रोमहर्षक चुरशीच्या अंतिम सामन्यात सिद्धेश्वर दाळकर संघ, तळवडे यांनी स्टार किंग निरवडे संघास पराभूत करत विजेतेपद पटकाविले, स्टार किंग निरवडे संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर शालेय गटात श्री जनता विद्यालय तळवडेला नमवित न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाने बाजी मारत विजेत्या पदाचे मानकरी ठरले.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने श्री जैतीर मंदिर तुळस येथील मैदानावर आयोजित शालेय व खुल्या पुरुष रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन तुळस सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई परब, संतोष परब, निलेश नागवेकर, पोलीस उपनिरीक्षक रंजिता चौहान, तुळस उपसरपंच सचिन नाईक, ग्रा.प.सदस्य जयवंत तुळसकर आणि नारायण कुंभार, जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव व राष्ट्रीय रस्सीखेचपटू
किशोर सोनसुरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर व नाना राऊळ, प्रकाश परब, सुजाता पडवळ, मधुकर परब, सुधीर चुडजी, महेश राऊळ, मंगेश सावंत, सद्गुरु सावंत, प्रसाद भणगे, हेमंत गावडे आदी उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय शालेय व खुल्या गटातील रस्सीखेच स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला. बेस्ट फ्रंटमन सतीश नाईक (स्टार निरवडे) आणि बेस्ट लास्टमन दादा परब (सिद्धेश्वर दाळकर) यांनी बहुमान मिळविला. मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी समिजिक कार्यकर्ते विकास घारे आणि माजी मुंबई महानगरपालिका नगरसेवक दादा नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले.
फोठोओेळी – तुळस येथील रस्सीखेच स्पर्धेत विजय संपादन करण्यासाठी दोन्ही संघांनी काटे की टक्कर दिली.
