रासेयोचे निवासी शिबिर संपन्न

⚡वेंगुर्ला ता ३१-: स्वयंसेवकांनी मनापासून काम करावे आणि माणुसकी जपावी असे आवाहन परबवाडा सरपंच शमिका बांदेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिर प्रसंगी केले.

    बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर २२ ते २८ डिसेंबर कालावधीत परबवाडा या गावात संपन्न झाले. या शिबिरामध्ये योगासने, प्राणायाम, श्रमदान, उद्धबोधन, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिक सर्वेक्षण आदी कार्यक्रम घेण्यात आले. तर डॉ.स्वप्नाली पवार, चव्हाण, अॅड.सागर ठाकूर, वनक्षेत्रपाल सी.एच.जगदाळे, प्रा.वैभव खानोलकर, संदिप परब, सुनिल परब आदींनी विविध विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

  या शिबिराचा समारोप २८ डिसेंबर रोजी सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, सदस्य संतोष सावंत, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, सुहिता हळदणकर, हेमंत गावडे, अरुणा गवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, संजय मळगांवकर, गजानन सावंत, धनश्री सावंत, उदय सावंत, रवी परब, सुमेधा सुर्वे, शिवराम परब, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, सदस्य प्रा. एल.बी.नैताम, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.एस.के.जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी मोहन मोबारकर व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत झाला. पपू परब यांनी सोशल मिडियाचा योग्य वापर व नशा बंदीवर आपले विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून व्यक्तिमत्व विकास, शिस्त, सामाजिक आपुलकी, श्रमदान, कौशल्य विकास या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजतात अशी माहिती प्राचार्य देऊलकर यांनी दिली. तर रवी परब यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव स्वयंसेवकांना सांगितले.

  कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.व्ही.सावंत यांनी सूत्रसंचालन, प्रा.व्ही.एस.चव्हाण यांनी प्रास्ताविक तर आभार प्रा.एस.जी.चुकेवाड यांनी आभार मानले.

फोटोओळी-राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरासाठी परबवाडा गावातून मिळालेल्या सहकार्याबद्दल गावाचे प्रथम नागरिक सरपंच शमिका बांदेकर यांचा प्राचार्य देऊलकर यांनी सत्कार केला.

You cannot copy content of this page