त्याची सुरुवात सावंतवाडीतून;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे सूचक विधान
⚡सावंतवाडी ता.३०-: विकासाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची यापुढे गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कारवाईची भूमिका होणार आहे आणि याची सुरुवात सावंतवाडीतून झाली आहे असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे दिला.
तर मागील तीन वर्षापासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात झालेली दिरंगाई व भ्रष्टाचाराबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.श्री तेली यांनी आज येथे भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
