⚡कणकवली ता.१०-: असरोंडी गावची आराध्य व जागृत ग्रामदेवता श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण तृतीया रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी श्री पावणादेवी मंदिर येथे होणार आहे.
शुक्रवार 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता देव राठीसह श्री लिंगेश्वर देवालय येथे भेटीला गेले. तेथून शनिवारी दुपारी 12 वा. देव, राठीसह सर्व ग्रामदैवातांच्या भेटीसह गावप्रदक्षिणा करून श्री पावणादेवी देवालयात पोहचणार आहेत. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी सर्व धार्मिक कार्यक्रम होवून ओटया भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 11.00 वा. देवतरंगासह सवाद्य मिरवणूक निघणार असून रात्री 12 वा. चेंदवणकर गोरे दशावतारी मंडळ कवठी यांचे दशावतारी नाटक होणार आहे. या आराध्य व जागृत श्री पावणादेवीचा जत्रोत्सवास मुंबईस्थित नागरीक व जिल्हयातील अनेक भाविक उपस्थित राहतात तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
