दिव्यांग समता सप्ताह निमित्त गटसाधन केंद्र, कणकवली येथे विविध स्पर्धा

⚡कणकवली ता.०६-: समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त गटसाधन केंद्र, कणकवली येथे गटशिक्षणाधिकारी व गटसमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी धावणे, स्पॉट जम्प, रंगभरण, बादलीत बॉल टाकणे, संगीत खुर्ची इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहामध्ये व आनंदी वातावरणामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा उद्देश दिव्यांग मुलांच्या सुप्त कला गुणाना वाव देणे तसेच सर्व सामान्यामध्ये त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे. व त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.

या स्पर्धेवेळी गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी, प्राथमिक शाळेचे शिक्षक, दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page