एकमुखी दत्त मंदिरात विविध कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.०४-: कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात २९ नोव्हेंबरपासून दत्तजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त ६ डिसेंबरपर्यंत रोज रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे.

  बुधवार दि. ७ रोजी पहाटे काकड आरती, सायं. ६ ते ७ नामस्मरण, रात्रौ ८ वा. ह.भ.प.दत्तात्रय उपाध्ये (वालावल) यांचे दत्तजन्माचे कीर्तन, १० वा. दत्तजन्म, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, आरती, प्रसाद, दि. ८ रोजी दुपारी १ पासून महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आाहेत. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.
You cannot copy content of this page