⚡वेंगुर्ला ता.०३-: आनंदयात्री वाङ्मय मंडळाने आयोजित केलेल्या वेंगुर्ल तालुका त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनात दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी बॅ. खर्डेकर कॉलेज येथे दोन गटात वकृत्व स्पर्धा तर दुपारी ३ वाजता बॅ. खर्डेकर कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हाणार आहे.
लेखक प्रदीप केळूसकर यांनी लिहिलेल्या ‘एकापेक्षा एक‘ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा अध्यक्ष पाडुरंग कौलापुरे, प्रमुख पाहुणे चित्रकार अरूण दाभोलकर, लेखिका वृंदा कांबळी व प्राचार्य विलास देऊलकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पुस्तक पकाशन सोहळ्यास सर्व रसिकांनी व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहून कथांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळाने केले आहे.
