दर्शना रासम यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.०३-: इनरव्हील क्लब क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून २३ ते २५ डिसेंबर रोजी जनरल जगन्नाथ भोसले शिव उद्यान सावंतवाडी येथे इनरव्हील महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्शना रासम यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात मनोरंजनासाठी ‘पद्मश्री पुरस्कार प्राप्त’ श्री. परशुराम गंगावणे यांचा कठपुतली शो, सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, स्टॅच स्पर्धा तसेच ‘इनरव्हील क्वीन’ ही स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली आहे. या महोत्सवातील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसेही आयोजित केली आहेत. त्याचप्रमाणे ‘लकी ड्रॉ’ कुपन’ हे महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असेल.
कोरोना काळात उद्योगधंद्यात आलेल्या मंदीनंतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील लघु उद्योजकांना स्टॉलच्या माध्यमातून व्यवसायाची एक उत्तम संधी उपलब्ध होत आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या महोत्सवाला सावंतवाडीतील, आजुबाजूच्या गावातील आणि पर्यटक मिळून १०००० ते १५००० लोक भेट देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच स्टॉलच्या माध्यमातून उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी असून इच्छुक व्यावसायिकांनी स्टॉलसाठी रिया रेडीज 9422076721,
सोनाली खोर्जुवेकर 9422076645, शकुन म्हापसेकर 9405925702, व ममता पाटणकर
9403073611 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी इनरव्हील अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, सुमेधा नाईक, देवता हावळ, डॉ. शुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी व मृणालिनी कशाळीकर आदी उपस्थित होते.
