मुलांच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासासाठी कणकवलीत 6 डिसेंबरला मार्गदर्शन

मनशक्ती लोणावळा संस्थेने घेतला पुढाकार

⚡कणकवली ता.०३-:
मुलांच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासासाठी मनशक्ती लोणावळा ही संस्था खूप वर्षे कार्य करत आहे या संस्थेचे काही सदस्य आपल्या कणकवली शहरात येऊन शाळांमध्ये जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
6 डिसेंबर रोजी सायंकाळी मराठा मंडळ हॉलमध्ये विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त अभ्यासयश,अभ्यासाच्या सोप्या पद्धती,एकाग्रता कशी वाढवावी,
स्मरणशक्तीसाठी मेंदूव्यायाम
कृतज्ञता, चांगले वागणे,मोबाईलचे दुष्परिणाम,आरोग्याची काळजी या विषयावर तर पालकांसाठी विवेकी पालकत्व,मुलांचा सर्वांगीण विकास
शारीरिक,मानसिक,बौद्धिक प्रगती
समस्या कशा हाताळाव्या
पालकत्व समृद्ध कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
सहभागी होण्यासाठी सौ. विभा योगेश सावंत (9423884412), सौ. सुवर्णा शेखर राणे (9922120014) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page