मनसेच्या मागणीनुसार झाराप-पत्रादेवी मार्गांवरील झाडी तोड कामाला अखेर सुरुवात

सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश परब, शतायु जांभळे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश

⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-नेमळे दरम्यान सर्विस रोड व मुख्य रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाढलेली झाडी व चारा अखेरीस कापण्यात आला असून साफसफाईही करण्यात आली आहे. यामुळे सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिक राकेश परब, शतायु जांभळे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.


पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या मळगाव व नेमळे परिसरातील हायवे डिव्हायडर व रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडीमुळे अनेक अपघात होण्याबरोबरच वाहन चालकांना वाहन चालविताना व पादचारी यांना चालण्यास अडचणी येत होत्या. ही बाब ध्यानात घेऊन मनसे सैनिक सुधीर राऊळ यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते राकेश परब, शतायु जाभळे, महेंद्र कांबळी, प्रथमेश राणे, आदित्य राऊळ, साईल तळकटकर, केतन सावंत, जय राऊळ यांनी आवाज उठवत काही दिवसांपूर्वी संबंधीत अधिकारी यांचे याकडे लक्ष वेधले होते. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत होता. प्रचंड प्रमाणात वाढलेली ही झाडी मागील दोन महीने आहे तशीच होती. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही बाब ध्यानात घेऊन लवकरात लवकर कामे करावीत अन्यथा मनसे आक्रमक होऊन आपल्या पद्धतीने आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. मनसे स्टाईलने देण्यात आलेला इशारा व आंदोलन टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारामार्फत कटर कामगार लावून ही झाडी तोडण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरु करुन महामार्ग चकाचक केला आहे. याबाबत मनसे सैनिक सुधीर राऊळ यांनी कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व झाडी साफ करणाऱ्या कंत्राटदार कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page