Headlines

नगरवाचनालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०२-: नगर वाचनालय, वेंगुर्ला तर्फे श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती पुरस्कृत वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील प्राथमिक शाळांसाठी २७ नोव्हेंबर रोजी वैयक्तिक व सामुहिक स्वरुपाच्या मराठी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाल्या. स्पर्धेतील पहिले पाच क्रमांक पुढीलप्रमाणे.-

  इयत्ता पहिली ते चौथी (वैयक्तिक गट) - कथाकथन - तनिषा गुंजन केळुसकर (वेंगुर्ला नं.१), माधव श्रीपाद ओगले (वेंगुर्ला नं.२), शिवन्या प्रफुल्ल बांदवलकर (मदर तेरेसा स्कूल), आर्या गोपाळ चेंदवणकर (एम.आर.देसाई स्कूल), श्रेया दिपक डामसे (दाभोस शाळा), इयत्ता पाचवी ते सातवी (वैयक्तिक गट) - गीतगायन - अदिती विवेक चव्हाण (एम.आर.देसाई स्कूल), कस्तुरी दिनेश तुळसकर (मदर तेरेसा स्कूल), मैथिली अनंत केळुसकर (नवाबाग शाळा), सुरेंद्र रामप्रकाश प्रजापती (वेंगुर्ला नं.३), भुमिका भरत असनकर (वेंगुर्ला नं.४), इयत्ता पहिली ते चौथी (सामुहिक गट)-समुहगीत- मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला नं.१, एम.आर.देसाई स्कूल, वेंगुर्ला नं.४, राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा, इयत्ता पाचवी ते सातवी (सामुहिक गट) -- समुहगीत - वेंगुर्ला नं.४, एम.आर.देसाई स्कूल, वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२, नवाबाग शाळा.

  या कार्यक्रमासाठी साथसंगत गजानन मेस्त्री व सरवणकर यांनी केली. तर प्रा.महेश बोवलेकर, माया परब यांनी परीक्षण केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परुळेकर, कार्यकारी मंडळ सदस्य मंगल परुळेकर, श्रीनिवास सौदागर, सचिन होडावडेकर यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल सौदागर, स्वागत कार्यवाह कैवल्य पवार य्यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना जानेवारी २०२३ मध्ये गौरविण्यात येणार आहे.
You cannot copy content of this page