प्रा आनंद सावंत यांच्याहस्ते प्रारंभ
बांदा/प्रतिनिधी
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरस यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस शहरामध्ये आज पतंजली योग वर्ग चालू करण्यात आला. या वर्गाचे उद्घाटन ब्रिगेडियर सुधीर सावंत व कृषी महाविद्यालयचे प्रा. आनंद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी शेखर बांदेकर पतंजली योगसमिती उपजिल्हा प्रभारी तुळशीराम रावराणे, पतंजली योगसमिती जिल्हा प्रभारी आनंद परब, युवा जिल्हा प्रभारी विवेक राणे, सैनिक फेडरशनचे जिल्हा अध्यक्ष श्री परब, कणकवली तालुका प्रभारी प्रकाश कोचरेकर आदी उपस्थित होते. दीप lप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी योग वर्गामध्ये लक्षणीय उपस्थिती होती. सर्वसाधारकांनी सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम असा अभ्यास केला उद्यापासून योग वर्ग सकाळी साडेपाच ते सात या वेळेस दररोज सुरू राहील.
कर्नल सुधीर सावंत यांनी रोगमुक्त होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ओरोस मधील सर्व नागरिकांनी या योग वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
