भाजप युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहर भाजपचे युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्यावतीने रविवारी मालवण किनारपट्टीवर दांडी ते बंदर जेटी या दरम्यान राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.
सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या आदर्शवत उपक्रमाला विविध स्तरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. विविध सामाजिक संस्था, नागरिक, पर्यावरण प्रेमी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते युथ बिट्स फॉर क्लाइमेट, लायन्स क्लब मालवण, जिज्ञासा फाउंडेशन, नगरपालिका आरोग्य विभाग, मक्रेश्वर दांडी मित्रमंडळ, मक्रेश्वर मित्रमंडळ गवंडीवाडा, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अश्या संस्थांचा सहभाग लाभला. निषय पालयेकर, राकेश सावंत, चंद्रकांत मयेकर, चिन्मय ढोलम, चेतन हरमलकर, चित्रा हरमलकर, अनिकेत चव्हाण, यासह अक्षय रेवंडकर, भाऊ मोर्जे, वैशाली शंकरदास, विनोद शंकरदास, स्वाती, मेगल ऐश्वर्य मांजरेकर यासह पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रविवारी २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा स्वच्छता मोहीम
यावेळी बोलताना सौरभ ताम्हणकर याने यापुढेही किनारी भागात सातत्याने स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून रविवारी २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा दांडी ते बंदर जेटी मालवण अशी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे असे सांगितले
