तोपर्यंत दोन्ही परिसर बंद ठेवा;अन्यथा मनसे बंद करा: कुलगुरूंना इशारा
⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्गात मुंबई विद्यापीठकडून सुरू करण्यात आलेले तालुक्यातील एका मॉडेल कॉलेज, तसेच सावंतवाडी येथील एका विद्यापीठाचा उप परिसर याबाबत विद्यापीठाकडून अनास्था दिसून येत आहे. येथील कामकाज पाहण्यासाठी तसेच स्वच्छता करण्यासाठी अद्याप एकही कर्मचारी नियुक्त केला नसल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच इथे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. इथे योग्य ती सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईपर्यंत येथील दोन्ही परिसर बंद ठेवावेत अन्यथा मनसे बंद करेल, असा इशारा मनसेच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आला आहे.
