सुषमा अंधारेंच्या सभेस मालवणातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार – हरी खोबरेकर

⚡मालवण ता.२०-: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा उद्या दि. २१ नोव्हेंबर रोजी कणकवलीत होत आहे. या सभेस मालवण तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक कणकवलीला जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उद्या सिंधुदुर्गात येत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली धडकी भरली आहे. अंधारे यांची कणकवलीत तोफ धडाडणार आहे. या सभेसाठी तालुक्यातून जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असेही श्री. खोबरेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page