शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्या सिंधुदुर्गात

जिल्ह्यातील शिवसैनिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, :संदेश पारकर

⚡कणकवली ता.२०-: -ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणीला वेग येताना पाहायला मिळत आहे. त्यामध्ये आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उद्या सोमवारी सिंधुदुर्गात येत सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. अंधारे त्यांच्या सभेची तोफ कणकवलीमध्ये धडाडणार आहे.तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा ,ओबीसी सेल सेना , त्याचप्रमाणे महिला शिवसैनिकांनी या सभेसाठी हजारोच्या संख्येने सभेला उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसेनेचे कार्य सम्राट नेते संदेश पारकर यांनी केले आहे आहे

राज्यात सत्तेवर असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी केलेलं नियोजन केलेले आहे . केंद्रीय संस्थांचा वापर करून अनेक शिवसेनेच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न शिंदे -फडणवीस सरकार करताना दिसत आहे. तसेच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा लाजीरवाणी आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी या उद्देशाने शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेतुन सर्वांचे वाभाडे काढले जाणार आहेत

You cannot copy content of this page