⚡सावंतवाडी ता.१८-: पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि 21 नोव्हेंबर 2022 रोजी ओरोस शहरामध्ये पतंजली योग वर्ग चालू करण्यात येत आहे. मधुमेह,रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष योगोपचार मार्गदर्शन आणि योगाभ्यास होईल सदर योग वर्ग छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस येथे दररोज सकाळी 5:30 ते 7:00 या वेळेमध्ये चालू करण्यात येत आहे . त्यामुळे ओरोस शहरातील सर्व योगाभ्यास प्रेमी साधकांनी या योगवर्गाचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर 9823881712, आनंद परब 8104932130 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
ओरोस मध्ये 21 नोव्हेंबर पासून पतंजली योगवर्ग
