न्हावेलीत १९ रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

⚡बांदा ता.१६-: कुंभारभाट मैदान, न्हावेली – चौकेकरवाडी येथे रुग्णवाहिकाच्या लोकार्पण निमित्त शनिवारी १९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता सत्यनारायण महापूजा, १० ते १. वाजता रक्तदान शिबिर , दुपारी ३ वाजता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, सायंकाळी ४ ते ५ वाजता महिलांसाठी हळदीकुंकुचा कार्यक्रम, सायंकाळी ५ ते ७.३० पर्यत लहान मुलांचे मनोरंजक खेळ, रात्री ९ ते ११ जागतिक किर्तीचे महान जादुगार वैभवकुमार यांचा धमाल कार्यक्रम, सोबत गेम शो व काराओके सिंगींग आर्केस्ट्रा व महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री ११. वाजता स्थानिक ग्रामस्थांची भजने होणार आहे लाभ घ्यावा, असे आवाहन एसपीएल मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page